*कोकण Express*
*विद्यार्थ्यांना दिलासा-दहावी बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ २५जानेवारीपर्यंत अवधी*
*जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या प्रयत्नाना यश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.आता विद्यार्थ्यांना २५जानेवारी पर्यंत अर्ज भरता येतील.सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मुदतवाढ मिळावी यासाठी तत्कालीन अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे मॅडमयांच्याशी अध्यक्ष श्री वामन तर्फे यांनी चर्चा करून निवेदन दिले होते.व कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर विद्यार्थी उपस्थितीची अडचण लक्षात घेऊन तसेच तांत्रिक अडचणींचा विचार करून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली होती.तसेच राज्य मंडळाचे सचिव मा.श्री.भोसले साहेब यांच्याशी संपर्क साधून याबाबत पाठपुरावा केला होता.आता बोर्डाकडून मुदतवाढ देण्याबाबत आज परिपत्रक काढून २५जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दहावी बारावी परिक्षेचे अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या तसेच कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर विद्यार्थी उपस्थितीची अडचण निर्माण झाली होती.त्यामुळे शाळांपुढे प्रश्र्न निर्माण झाला होता.११जानेवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख होती त्यामुळे विद्यार्थी, शाळा, पालक चिंतेत होते.बोर्डाच्या निर्णयामुळे आता सर्वांना दिलासा मिळाला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनी बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षा डॉ काळे मॅडम, विद्यमान सचिव मा.श्री.भोसलेसाहेब,कोकण विभागीय मंडळाचू सचिव मा.श्री.पटवेसाहेब यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.