*कोकण Express*
*राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक यांची नियुक्ती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावलाराम अनावकरगुरूजी,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावस्कर, माजी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास गावकर,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर सरचिटणीस गणेश चौगुले, राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर,माजी राष्ट्रवादी ग्राहक सवरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे,केदार खोत, प्रवीण मोर्ये उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून श्री नाईक हे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काम करत आहेत. पक्षाच्या कठीण काळातही त्यांनी समर्थपणे काम केले होते. राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या काम केले होते. पवार कुटुंबीयांशी निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे.
दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम श्री नाईक यांनी जिल्ह्यात फटाके लावत आनंद उत्सव साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी नुकतीच मुंबईत जाऊन अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांची भेट घेतली होती.दरम्यान गुरुवारी त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा आपणाला विश्वास असल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. .