*कोकण Express*
*शालेय विद्यार्थ्यांचे दु:खद निधन*
त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे या प्रशालेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारा ओमकार दशरथ घाडीगांवकर या१४वर्षाच्या विद्यार्थ्याचे अल्प आजाराने दु:खद निधन झाले. असगणी गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ओमकारच्या निधनाने संपूर्ण गावासह हायस्कूलमध्ये शोककळा पसरली. शांत, प्रामाणिक, अभ्यासू, शिस्तप्रिय असलेला ओमकार मनाला चटका देऊन गेल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे यांनी सांगितले. ओमकार शुक्रवार पर्यंत शाळेत होता. सोमवारी रात्री त्याचे निधन झाले. एकुलता असलेल्या ओमकारच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना