*कोकण Express*
*कणकवलीत संस्कृत भारती कोकण प्रांत आयोजीत ‘संस्कृत संभाषण’ शिबीराचा शुभारंभ ; १३ जुलै पर्यंत चालणार शिबीर*
*कणकवलीत ःःप्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात ‘संस्कृत भारती कोकण प्रांत’ यांच्या तर्फे संस्कृत संभाषण शिबीराला काल प्रारंभ झाला. कणकवली बस आगारासमोरील उत्कर्ष उपहारगृहाच्या वरचा मजल्या वर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्कृत संभाषण शिबिरात पहिल्या दिवसापासूनच ‘संस्कृतमधून बोलूया’ अशी संकल्पना आहे. यात १५ वर्षे व वरील वयोगटातील खुला वर्ग सहभागी होऊ शकतो.
‘वही नको, पेन नको, संस्कृतचे पूर्वज्ञान असण्याची गरज नाही, व्याकरण पाठांतर नाही, हसत खेळत संस्कृत, संस्कृत गाणी आणि गोष्टी अशी या शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एका कुटुंबातील २ किंवा अधिक सदस्य सहभागी झाल्यास सरावदृष्ट्या लाभदायक असल्याचे आयोजकांनी सांगितले असून हे शिबीर संपूर्ण निःशुल्क आहे. २३ जुलै २०२३ पर्यंत संध्याकाळी ५ ते ०६.३० अशी शिबिराची वेळ आहे.