*कोकण Express*
*कासार्डेच्या माजी विद्यार्थ्यानी केलेल्या डिजीटल वर्गाचा हस्तातंरण सोहळा दिमाखात*
*कासार्डे ; संजय भोसले*
कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मित्र परिवाराने एक वर्ग डिजिटल करुन दिला. या डिजिटल वर्गाचा शाळेकडे हस्तांतरण कार्यक्रम झाला. त्यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेला या शाळेचे माजी शिक्षक तसेच शाळा कार्यकारिणीचे सल्लागार प्रभाकर कुडतरकर यांनी पुष्पहार घालून अन् त्यानंतर फीत कापून या स्मार्ट डिजिटल वर्गाचे शाळेकडे हस्तांतर करण्यात आले. यावेळी स्थानिक शाळा कमिटी कार्याध्यक्ष संजय पाताडे, कार्यवाहक रवींद्र पाताडे, शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, शाळा कमिटीचे सल्लागार प्रभाकर कुडतरकर, प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर खाडये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर यांच्यासह सर्व शिक्षक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
एक शैक्षणिकदृष्ट्या भरीव गोष्ट द्यावी हे सर्वांच्या चर्चेअंती एकमताने ठरले. सर्व जगच आधुनिक होत आहे. सध्याच्या मुलांनाही काही प्रमाणात का होईना, आधुनिक जगाची ओळख व्हावी, नवनवीन शैक्षणिक ॲप्सद्वारे त्यांना आधुनिक शिक्षण मिळावे, प्रसन्न वातावरणात मुलांना शिकता यावे ही संकल्पना मनात ठेवूनच या माजी विद्यार्थी मित्र परिवाराने 5 वीचा संपूर्ण वर्ग स्मार्ट व डिजिटल करुन दिला.
या मित्रपरिवाराची थोडक्यात रूपरेषा, स्थापना, त्याची उद्दिष्टे, सर्वांचा सहभाग, त्यांच्या होणार्या सभा, सभासद याविषयी सविस्तर प्रास्ताविक सौ. नंदिनी राणे यांनी केले. हा डिजिटल वर्ग वेळेत पूर्ण करुन दिल्याबद्दल दिलीप शेलार, शाळेचे माजी प्रयोगशाळा सहाय्यक श्री. शेलार, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, माजी विद्यार्थी बाबू राणे, नारायण पाताडे, सरिता कुडतरकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले, त्याबद्दल या सर्वांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या सर्व मान्यवरांनी शाळेबद्दल तसेच मित्रपरिवाराविषयी आणि राबविलेल्या उपक्रमाबद्दल प्रकाश वाडेकर (निसर्गोपचार तज्ज्ञ), सौ. विभावरी राणे (निवृत्त अधीक्षक महाराष्ट्र राज्य कृषी खाते), अविनाश वाडये या कार्यक्रमासाठी खास कोल्हापूरहून आलेल्या श्रीमती उषा राणे, कोविडयोद्भा सौ. समीक्षा कर्ले (सध्या कार्यरत केईएम हाॅस्पिटल, मुंबई) या सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी, पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून माजी विद्यार्थी उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमासाठी योगदान देणारे संतोष राणे, कमलेश तळेकर, सरिता कुडतरकर, मधुकर खाडये, सौ. माधुरी रोहित कर्ले, सौ. समीक्षा कर्ले, प्रकृतीअस्वास्थ्यामुळे येऊ न शकलेले पण सतत प्रोत्साहन देणारे गुरुनाथ नकाशे, बाबू राणे, प्रकाश धुरी, सरिता कुडतरकर, रोहित कर्ले, माजी विद्यार्थी आणि कासार्डे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार पाताडे, व्यावसायिक नागेश लडगे आणि सार्याच मित्रपरिवाराचे खास धन्यवाद दिलीप राणे यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नंदिनी राणे यांनी केले.