आमदार नितेश राणे यांनी आतापर्यंत काय केले ? | मंत्री पदाकडे नको तर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेकडे लक्ष द्या

आमदार नितेश राणे यांनी आतापर्यंत काय केले ? | मंत्री पदाकडे नको तर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेकडे लक्ष द्या

*कोकण Express*

*आमदार नितेश राणे यांनी आतापर्यंत काय केले ? | मंत्री पदाकडे नको तर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेकडे लक्ष द्या.!*

*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आमदार राणेंना टोला. !*

*कणकवली ः प्रतिनिधी*

उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेबाबत डॉक्टरांना उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेण्याकरिता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची भेट घेत चर्चा केली.

यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात काही रुग्णांवर उपचार न करण्यामागची नेमकी कारणे काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व माजी नगरसेवक कन्हैया परकर यांनी केला. शक्य असलेल्या रुग्णांवर येथे उपचार होतात. ज्या रुग्णांवर उपचार करता आवश्यक मशिनरी गरजेची आहे ती मागणी करूनही अद्याप मिळाली नसल्याची बाब डॉ. धर्माधिकारी यांनी निदर्शनास आणली. त्यावर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष असणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी याबाबत आतापर्यंत काय केले. मंत्री पदाकडे नको तर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेकडे लक्ष द्या असा टोला सुशांत नाईक यांनी यावेळी लगावला. तर माजी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी या रुग्णालयात आलेले रुग्ण खाजगी रुग्णालयात पाठविण्याकरिता प्रयत्न होत असतील तर ही बाब चुकीची आहे, खाजगी हॉस्पिटल चालवण्यासाठी या रुग्णालयाचा वापर होऊ देणार नाही. आमदार नितेश राणे यांच्या खाजगी हॉस्पिटल करीता हे उपजिल्हा रुग्णालय नाही असा गंभीर आरोप पारकर यानी केला.

यावेळी डॉ. धर्माधिकारी यांनी संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेल्या पत्रव्यवहाराची प्रत ही शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला दाखवली. त्यावेळी श्री नाईक यांनी आम्ही आमच्या आमदार खासदारांमार्फत याबाबत पाठपुरावा करतो अशी ही भूमिका घेतली.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, रुपेश नार्वेकर, माजी सरपंच रुपेश अंबडोस्कर, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन अचरेकर, वैभव मालनडकर, तेजस राणे, योगेश मुंज, सोहम वाळके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!