*कोकण Express*
*आम्हाला काही नाही मिळालं तरी चालेल, शरद पवार साहेबांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही*
*अर्चना घारे; फटाके फोडणारे, आनंदोत्सव करणारे “ते” राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत…..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मला काही मिळाले नसले तरी चालेल पण शरद पवार यांना सोडून माझ्यासह अन्य पदाधिकारी कुठेही जाणार नाहीत. अजित पवार हे आजही आमचे आदर्श आहेत. परंतु त्यांच्या भूमिकेला आमचे समर्थन नाही, अशी परखड भूमिका आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे यांनी स्पष्ट मांडली. तुर्तास तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीत फुट पडलेली नाही. सर्व जण शरद पवार यांच्या सोबतच आहे. मात्र ज्यांनी फटाके फोडले, आनंदोत्सव साजरा केला त्याची कार्यकारिणी यापूर्वीच गोठविण्यात आली आहे. ते आता कोणतेही पदाधिकारी नाहीत, असेही त्यांनी सांगितले. पवार यांच्या उपस्थितीत उद्या होणाऱ्या बैठकीला चारे यांच्यासह विधानसभा मतदार संघातील अन्य पदाधिकारी जाणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, राकेश नेगी, चित्रा बाबर देसाई, हिदायतुल्ला खान, सायली दुभाषी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सौ. धारे म्हणाल्या, काही झाले तरी आम्ही श्री. पवार यांच्या सोबतच थाबण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार आमचे आजही
आदर्श आहेत. परंतु वयाच्या ८३ व्या वर्षी श्री. पवार यांना ज्या वेदना दिल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबतः
राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पुढे म्हणाल्या, आत्ता पवार हे सत्तेत आले आहेत. त्यामुळे काही तरी मिळेल म्हणून मी त्यांच्या सोबत
जाणार नाही, यापूर्वी सुध्दा मला तिकीट मिळणार होत, मात्र आयत्यावेळी पक्षाच्या वरिष्ठानी अन्य निर्णय घेतला. त्यावेळी सुध्दा मी पक्षाशी
प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला आणि आजही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, असे त्या म्हणाल्या.