*कोकण Express*
*वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गाचे काम निकृष्ट, चौकशी करा….*
*सावंतवाडी भाजपाची मागणी; बिल अडविण्यासोबत ठेकेदारांवर कारवाईची मागणी…..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला-बेळगाव या राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा आरोप करीत या कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. ऐन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे काम चुकीच्या पध्दतीने करण्यात आले. त्यामुळे या कामाचे बिल अदा करण्यात येवू नये, असेही पदाधिकान्यांनी म्हटले आहे. भाजपा आंबोली मंडळाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक रविंद्र मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी करण्यात आली.