*कोकण Express*
*वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी शरद पवार साहेबां बरोबरच रहाणार*
*अर्चना घारे-परब यांनी बोलावलेल्या विशेष सभेस तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकत्यांनी जाहिर केला निर्णय*
*सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी पक्षीय प्रतिज्ञापत्रेही केली सादर*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
राज्यात निर्माण झालेल्या राजकिय पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे परब यांनी सोमवारी खास तातडीने आयोजित केलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विशेष सभेत ‘आम्ही सर्व शरद पवार यांचेच नेतृत्व काल मानत होते. आजही मानत आहोत अन उद्याही मानणार असल्याचा निर्धार जाहिर केला. शरद पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है. च्या घोषणा देण्यात आल्या.
राज्यात निर्माण झालेल्या राजकिय पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे-परब यांनी बोलावलेल्या खास सभेस सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्ष अजित नातू, राष्टवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल, जिल्हा सदस्य नितीन कुबल, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी तालुका अध्यक्ष आबा टांककर, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष फैयाज शेख, महिला तालुकाध्यक्षा सौ. दिपिका राणे, महिला शहर अध्यक्षा सौ. सुप्रिया परब, युवती शहर अध्यक्ष अपूर्वा परब, शहर सचिव स्वप्नील रावळ, बाबतीस डिसोजा, जेष्ठ सदस्य बबन पडवळ, सुभाष तांडेल, आनंद मुळीक यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.
*राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी पक्षात असल्याची प्रतिज्ञापत्रे तात्काळ दिली भरून*
यावेळी सौ. घारे परब परब यांनी शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष आहेत आणि आपण सर्वा हे शरद पवार साहेबांबरच संघटनेत काम करणार आहोत. आपल्यांत कुणीही संभ्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण ठामपणे शरद पवार साहेबांबरोबरच असल्याचे पक्षीय प्रतिज्ञापत्रातून लेखी स्वरूपांत स्वमर्जीने कोणताही दबाव न येतो ती देण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार तात्काळ सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी आपली प्रतिज्ञापत्रे सौ. अर्चना घारे-परब यांच्याकडे सुपुर्द केली.
*मुंबईत येथे होणाऱ्या ५ जुलैच्या सभेस वेंगुर्लेतील सर्व पदाधिकारी जाणार*
यावेळी सौ. अर्चना घारे परब यांनी, मुंबई येथे शरद पवारांनी दि. ५ जुलै रोजी आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठकिसाठी जाण्याबाबत विचारणा केली असता सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या बैठकिस उपस्थित रहाण्याचे जाहिर केले.