*कोकण Express*
*शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले ते रवींद्र चव्हाण जयसिंगपूरचे…*
*राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा खुलासा; आमच्या तालुकाध्यक्षांबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शिवसेना पक्ष प्रवेशाबाबतची सुरू असलेली चर्चा चुकीची आहे.काल वैभववाडी बाजारपेठेत झालेल्या शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले ते रवींद्र चव्हाण हे जयसिंगपूरचे आहेत.आमचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीतच आहेत,असा खुलासा राष्ट्रवादीचे वैभव राणे व संकेत सावंत यांनी केला आहे.दरम्यान चुकीचा संभ्रम निर्माण करून कोणीही आमच्या आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करू नये,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की,काल वैभववाडी बाजारपेठेत शिवसेना पक्ष कार्यालयाच्या उद्गतान प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत रवींद्र गुलाबराव चव्हाण यांचा शिवसेना पक्ष प्रवेश झाला अशी चर्चा सुरू आहे.परंतु ते रवींद्र गुलाबराव चव्हाण हे जैसिंगपुर येथील रहवाशी आहेत.आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीतच आहेत.काहीजण चुकीचा संभ्रम निर्माण करत आहेत.त्यामुळे कोणीही आमच्या आघाडीत बिगाडी करायचा प्रयत्न करू नये,शिवसेना तालुकप्रमुख मंगेश लोके आणि आमची चर्चा सकाळीच झाली आहे.आम्ही सर्वजण एकत्र आहोत,जर कोण आम्हाला डीवचायचा प्रयत्न केला,तर वैभववाडी तालुका राष्ट्रवादी सक्षम आहे.असे म्हटले आहे.