शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव प्रशालेच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षदिंडीने कृषिदिन साजरा.!

शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव प्रशालेच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षदिंडीने कृषिदिन साजरा.!

*कोकण Express*

*शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव प्रशालेच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षदिंडीने कृषिदिन साजरा.!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विषयक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेली प्रशाला म्हणून शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव ची ओळख आहे. शनिवारी कृषी दिनाचे औचित्य साधून शिवडाव हायस्कूलमध्ये एक अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. वट पौर्णिमे प्रमाणेच शिवडाव हायस्कूल मध्ये एका वृक्षाची पूजा करून अभांगवाणी कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देखील यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. अभंगवाणी, वेशभूषा आणि वृक्षांचे आज काय महत्व आहे याचे महत्व पटवून देणारी वृक्षदिंडी प्रशालेच्या काढण्यात आली. तसेच गावात सार्वजनिक ठिकाणी, जिथे वृक्षतोड झाली आहे तिथे वृक्षारोपण करण्यात आले. मुळात प्रशालेचा परिसरच झाडांच्या सानिध्यात असल्याने येथे शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वृक्षारोपण व संगोपनाचे धडे घेता येतात.

वृक्ष दिंडीसह झाडे लावा झाडे जगवा…पर्यावरणाचे रक्षण करा, माकड करतो हुपहुप….झाडे लावा खूप खूप अशा घोषणा देत वृक्ष दिंडी यावेळी काढण्यात आली.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मसवेकर, मुकेश पवार, राजेश वाळके, रिया गोसावी, शितल पाटील, जोस्ना तेली, हरेश वाघाटे, भाग्यश्री पाताडे, चैतेश देसाई यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!