*कोकण Express*
*सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी येथील चौडेश्वरी फाऊंडेशन चा कलाकार मेळावा संपन्न*
रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी श्रीमंत ना . बा .घोरपडे नाट्यगृह येथे चौडेश्वरी फाऊंडेशन इचलकरंजी यांच्या वतीने कलाकार मेळावा संपन्न झाला .महाराष्ट्रातील विविध भागांतील विणकर समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .यावेळी सिधुदुर्ग तील सुप्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री अक्षता कांबळी ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या .तसेच हातकंगले च्या तहसीलदार कल्पना भंडारे मॅडम ही उपस्थित होत्या . चौडेश्वरी कला महोत्सव हा *श्री देवांग समाज* (रजि.)इचलकरंजी यांच्या अधीपत्याखाली 2016 साली जेष्ठ आमवाश्या निमित्त ,चौडेश्वरी कला महोत्सव ची स्थापना करण्यात आली .यामध्ये समाजातील कलाकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा ,त्यांना विनासायास स्टेज उपलब्ध व्हावे हा एकमेव हेतू होता . गेली आठ वर्षे हा कार्यक्रम स्थानिक कलाकारा साठी केला जातो ,ह्या वर्षी सिंधुदुर्ग तील सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली .दहा वर्ष्या पासून ते साठ वर्ष्या पर्यंत कलाकारांनी सहभाग घेऊन उत्तम कार्यक्रम सादर केला . कार्यक्रम च्या शेवटी अक्षता कांबळी ह्यांनी कलाकारांना उत्तम मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या बिझी शेड्यूल मधून समाजा साठी वेळ देत उपस्थित राहिल्या बद्धल चौडेश्वरी फाऊंडेशन चे अध्यक्ष विश्वनाथजी मुसळे ,युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रमोद जी मुसळे,यांनी अक्षता कांबळी यांचे मनःपूर्वक आभार मानले यावेळी कार्यक्रम स्थळी जनता बॅंक चे चेअरमन संजय अनिगोळ,प्रशांत सपाटे अमोल डाके , विनायक सोनटक्के तसेच नाशिक ,पुणे ,लातूर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते