*कोकण Express*
*डॉक्टरांना आपली मानसिकता बदलून रुग्णांना सेवा द्यावीच लागेल.!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वारंवार भेडसावत असणाऱ्या समस्या व प्रश्न याबाबत आढावा घेण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला शनिवारी भेट दिली. तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध प्रश्नांवर चर्चा देखील केली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातुन ओरोसला पेशंट रेफर करायचे नाहीत. पावसाळ्यात लोकांना सेवा द्यावी लागणार आहे. डॉ. धर्माधिका- यांना लातूरला जाताना तळमळ असते, तशी तळमळ इथे सेवा देताना दाखवा. आपल्याला लागणारी मदत आम्ही देवू. पण रुग्णालयात आलेला रुग्ण बरा होवूनच माघारी गेला पाहिजे. सेवा चांगली द्या, रुग्णांना इथुन बाहेर रेफर करु नका. जिथे काही अडचणी असतील, त्या आम्हाला सांगा. मात्र आम्ही याठिकाणी खोटी माहिती ऐकायला आलो नाही, तुमची खोटी आकडेवारी आम्हाला नको, या आकडेवारीने आम्ही समाधानी होणार नाही. या संदर्भात आपण आरोग्यमंत्र्याकडे जाणार आहे असल्याचे देखील आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
वैद्यकीय सेवा २४ तास असते, हे डॉक्टरांनी विसरून चालणार नाही. उपजिल्हा रुग्णालयाची ओळख वेगळी न बनवता सर्वसामान्य गोरगरीब जनतेच हे रुग्णालय आहे त्यांना चांगले उपचार, चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. डॉक्टरांनी आपली मानसिकता बदलावी, रुग्णांना चांगली सेवा द्यावीच लागेल. जर रुग्णालय चालवायचे नसेल तर टाळे मारू, असा इशारा भाजपा आ. नितेश राणे यांनी डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांना दिला आहे.
यावेळी अधिक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक संजय कामतेकर, भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे व उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉ. महेंद्र आचरेकर, डॉ. धनंजय रासम, डॉ. आदित्य शेळके, इतर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्टाफ चांगली सेवा देत नाही, कामापेक्षा सुट्टीवर जास्त असतो. सोनोग्राफी, एक्सरे, रक्ततपासणी वेळेवर होत नाही. रुग्णांना ओरोस, कुडाळ किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये रेफर केल जात. हॉस्पिटल चालवायचे नसेल तर टाळे मार, तुम्हाला सर्वांना ओरोसला पाठवूयात आणि बाहेर बोर्ड लावू जर दर्जेदार सेवा मिळत नसेल तर काय उपयोग ? नवीन तरुण डॉक्टर आले आहेत. त्यांना रुग्णालय प्रमुख म्हणून तुम्ही ही शिकवण देता का ? काही डॉक्टर घरी जास्त आणि रुग्णालयात कमी असतात. तुमच्या ड्युटीवर सेवा दिली पाहिजे. या रुग्णालयात इनकमिंग ठेवा आऊट गोईंग बंद करा. आलेल्या १० पेशंटमध्ये २ जीवंत जातात, ही ओळख बरोबर नाही, अशा समस्या सांगत आ. नितेश राणे यांनी मांडल्या वैद्यकीय अधिकान्यांना धारेवर धरले.