सोनगेवाडी क्रिकेट स्पर्धेत सुदर्शन संघ विजेता…! उपविजेता शिवनेरी स्पोर्ट वरवडे…!

*कोकण Express*

*सोनगेवाडी क्रिकेट स्पर्धेत सुदर्शन संघ विजेता…!*

*उपविजेता शिवनेरी स्पोर्ट वरवडे…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोणताही खेळ हा प्रत्येक खेळाडूंसाठी काही तरी शिकवणारा असतो.खेळाच्या माध्यमातून शारीरिक व्यायामामुळे दिवस देखील आनंददायी जातो.याच खेळाच्या माध्यमातून खेळाडू घडत असल्याचे उद्गार शिवसेना उपाध्यक्ष सुजित जाधव यांनी व्यक्त केले.
कणकवली सोनगेवाडी ओम नगर मित्रमंडळाच्या वतीने अंडर आर्म ओपन खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आशिये रोड पूर्णनंदनगर च्या मैदानात खेळवण्यात आल्या या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमावेळी ते बोलत होते.यावेळी नगरसेवक विराज भोसले,जेष्ठ नागरिक दीपक दुखंडे,सुंदर कोरगावकर,शुभम तांबे,वैभव सावंत,निखिल कांबळे,सिद्धेश मडव, दिशांत कांबळे,अमोल साबळे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत तालुक्यातील 24 संघांनी सहभाग घेतला होता.तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत क्रीडा रसिकांनी स्पर्धेचा आनंद लुटला.
या स्पर्धेतील अंतिम सामना सुदर्शन मित्रमंडळ (तेलीआळी)x शिवनेरी स्पोर्ट(वरवडे) यांच्यात खेळवन्यात आला.प्रथम फलंदाजी करताना 1 विकेटच्या मोबदल्यात सुदर्शन संघाने 4 ओव्हर मध्ये 53 धावांचा डोंगर उभारला.
प्रतिउत्तरास दाखल शिवनेरी स्पोर्ट वरवडे संघाचा डाव सुदर्शन मित्रमंडळाच्या भेदक माऱ्यापुढे 7 विकेटच्या मोबदल्यात 29 धावा पर्यँत मजल मारू शकला.
प्रथम विजेत्या सुदर्शन मित्रमंडळास 5,001 रु व चषक तर उपविजेत्या शिवनेरी स्पोर्ट संघास 2,501 रु.व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तर सामनावीर सुदर्शन संघाच्या खेळाडू सचिन दुखंडे, व उत्कृष्ट फलंदाज धनंजय दुखंडे तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चेतन फोंडेकर यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे पंच म्हणून सुमित वारंग,विशाल कांबळे यांनी काम पाहिले.तर स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!