कासार्डे विद्यालयात भरला वैष्णवांचा मेळा

कासार्डे विद्यालयात भरला वैष्णवांचा मेळा

*कोकण Express*

*कासार्डे विद्यालयात भरला वैष्णवांचा मेळा*

*आषाढी एकादशी निमित्त बाल गोपालानी साकारला ‘पालखी आणि रिंगण’ सोहळा!*

*कासार्डे ; संजय भोसले*

आषाढी एकादशीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थी व शिक्षकांनी पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय!! जय घोषांनी शालेय परिसर भक्तीसरात न्हावून निघाला होता.
शेकडो वर्षे सुरु असलेल्या वारीची परंपरा आणि त्यानिमित्ताने विविध संतांच्या पालख्या आषाढी एकादशीसाठी पंढरी दिशेने पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ होतात. सलग १६ ते १८ दिवस शेकडो कि.मी.अनवाणी पायी प्रवास करीत ते पंढरपूरात पोहचतात.या आपल्या संस्कृतीचे,सांस्कृतिक ठेव्याचे महत्व विद्यार्थी वर्गाला समजण्यासाठी तसेच पालखी सोहळ्यातील मॅनेजमेंट,सहनशीलता,ध्यास एकाग्रता,सातत्य,भक्तीभाव, शिस्तबद्धता, स्त्रीपुरूष समानता, विश्वबंधुता व एकरूपता असे अनेक मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत या हेतूने कासार्डे विद्यालयात प्रतिवर्षी वारकरी दिंडी आणि पालखी रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
प्रशालेतील छोट्या छोट्या विद्यार्थ्यी झेंडेकरी,
टाळकरी,वीनेकरी बनुन व डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थ्यिनींनी मैदानावर प्रतिकात्मक रिंगण सोहळा सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. याठिकाणी पालखीतील मनोरंजक वारकरी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून ‘याची देही याची डोळा पालखी सोहळा अनुभवला.
या उपक्रमात प्रशालेतील इ.५वी ते इ.७वी मधील ८० पेक्षा अधिक वारकरी दिंडीत सहभाग घेतला होता.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हुबेहूब वेशभूषा करीत विठ्ठल रुक्माई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा,संत एकनाथ ,संत सावतामाळी ,संत जनाबाई संत मुक्ताई,संत गोरा कुंभार ,चोपदार अशी अनेक संतमंडळी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अवतरली.पखवाज वादन इ.७वीतील विद्यार्थी अश्मेश लवेकर यांनी केले.
टाळ मृदुंगाच्या तालावर छोटे वारकरी मंडळी हातात भगवी पताका घेऊन विठुरायाच्या जयघोष ‘करीत पालखी सोहळ्यात रंगून गेली होती.
या सोहळ्याला संस्थेचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुतरकर, स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, रवींद्र पाताडे,श्री.पाताडे व इतर पदाधिकारी तसेच प्राचार्य एम.डी. खाड्ये , पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद उपस्थित होता.

*वारी हा आपला सांस्कृतिक ठेवा* : संजय पाताडे

दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे म्हणाले की,शेकडो वर्षांपासून सुरू असलेली वारी हा आपला सांस्कृतिक ठेवा असून या वारीतून आपणाला अनेक मुल्यांची शिकवण मिळत असते.यापैकी शिस्तबद्धता आणि एकरुपता हे गुण प्रत्येक विद्यार्थ्यानी अंगी रूजवावेत असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर यांनी पालखी सोहळा व वारीच्या अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकत वारीचे महत्व विद्यार्थ्यासमोर विशद केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्तात्रय मारकड यांनी तर आभार संजय भोसले यांनी मानले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजय भोसले,रजनी कासार्डेकर,आरती मडगावकर,चंद्रशेखर कल्याणकर,यशवंत परब,कु.प्रियंका सुतार, ऋषिकेश खटावकर,सौ.पुजा पाताडे व अन्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकवृंदाचे सर्व दशक्रोशीत कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!