सभासदांना अभिप्रेत पतपेढीचा कारभार करणार :- संजय वेतुरेकर

सभासदांना अभिप्रेत पतपेढीचा कारभार करणार :- संजय वेतुरेकर

*कोकण Express*

*सभासदांना अभिप्रेत पतपेढीचा कारभार करणार :- संजय वेतुरेकर*

*सर्वसमावेशक शिक्षक सहकार पॅनलचा आभार मेळावा*

*कासार्डे ; संजय भोसले*

गत निवडणुकीत आमच्या पॅनलला काठावरचे बहुमत असल्यामुळे पतपेढीचा कारभार करताना अनेकांचे हस्तक्षेप होत होते पण, या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी अनिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात मतदान करून आमच्या सर्वसमावेशक शिक्षक सहकार पॅनलला स्पष्ट बहुमत दिले आहे. हा पॅनलचा विजय नसून आमच्या सर्वसामान्य सभासदांचा विजय असल्याने यापुढे सभासदांना अभिप्रेत असलेला पतपेढी कारभार होईल असे आश्वासन नवनिर्वाचित संचालक तथा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी ओरोस येथे केले.
शिक्षक भारती सिंधुदुर्ग व शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनलच्या आभार मेळाव्यात संजय वेतुरेकर बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर पॅनल कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्यिक तथा बांद्याचे प्राचार्य गोविंद काजरेकर, पॅनेल प्रमुख सुरेश चौकेकर, प्रसाद पडते, राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण, मुख्याध्यापक श्री.कोठावळे,श्री.सुमंत दळवी,श्री. प्रभुखानोलकर,श्री. तसेच नवनिर्वाचित संचालक समीर परब,सुरेंद्र लांबुरे,स्वप्निल पाटील,विद्या शिरसाट, सत्यपाल लाडगावकर
(देवगड),शरद देसाई (दोडामार्ग),प्रदीप सावंत( सावंतवाडी),रमाकांत नाईक(कुडाळ),सुमित मसुरकर(मालवण)तसेच सुनील जाधव,बयाजी बुराण,संदीप काळे,घुसमट कवितासंग्रहाचे कवी युवराज सावंत श्री.केरकर,शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीमातेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी.चव्हाण यांनी करून स्वागत केले.
याप्रसंगी विजयाचे शिल्पकार पॅनेल प्रमुख सुरेश चौकेकर,प्रसाद पडते व संजय वेतुरेकर यांचा प्राचार्य गोविंद काजरेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच व्यासपीठावर उपस्थित विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचाही याप्रसंगी सत्कार झाला.याप्रसंगी
नवनियुक्त सर्वसमावेशक सहकार पॅनलचे सर्व ११ संचालक व इतर तीन उमेदवारांचही संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला.’ घुसमट’ कार कवी युवराज सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सुरेश चौकेकर, प्रसाद पडते, प्रशांत आडेलकर, संचालक समीर परब,सुरेंद्र लांबुरे,सौ.विद्या शिरसाट स्वप्निल पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले

*प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी लोक उभे राहतात. :- काजरेकर*
पतपेढी ही सर्वसामान्य सभासदांचे असते, त्यामुळे भ्रष्टाचाराला थारा न देता सभासद हित लक्षात घेऊन नुतन संचालकांनी काम करावे असे आवाहन केले व प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी अनेक लोक उभे राहतात हेच या विजयातून बोध मिळतो असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गोविंद काजरेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुष्मिता चव्हाण यांनी तर आभार प्रदीप सावंत यांनी मानून आभार मेळाव्याची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!