*कोकण Express*
*पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या वतीने श्री देव काळोबा मंदिर, मळेवाड येथे वृक्षारोपण कार्यक्रम*
पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र च्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील श्री देव काळोबा मंदिर परिसरात बेल व सोनचाफा या रोपांचे आज वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर, जिल्हा संघटक श्री. जाफर शेख, जिल्हा उपखजिनदार श्री. मदन मुरकर, महिला सदस्या श्रीमती सिमंतीनी मयेकर यांच्यासह मळेवाड व्यापारी संघटना अध्यक्ष श्री. पांडुरंग गावडे, उपाध्यक्ष श्री. रमाकांत नाईक, ज्येष्ठ नागरिक श्री. वसंत नाईक, श्री. भाऊ मुरकर श्री.अतुल मुरकर, श्री. आशिष मुरकर, श्री. रवींद्र तळवणेकर, श्री एकनाथ गावडे, श्री. संतोष गावडे, श्री. देऊ शिरसाट, श्री. विशाल नाईक यांच्यासह मळेवाड गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.