*कोकण Express*
*कणकवलीत एलसीबी पथकाने धाड : ३९ हजारांच्या गांज्या पकडला…..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला रंगेहाथ पकडले. त्यातील एक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला तर त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
• आरोपी वैभव सीताराम पांगम वय (२५ वर्षे), स्वप्नील सुरेश कुडतरकर (वय ३० वर्षे), रामदास तुकाराम पांगम (तिघे रा. नाटळ, ता. कणकवली) असून यातील संशयित आरोपी रामदास पांगम हा पसार झाला आहे एलसीबी पोलीस निरीक्षक श्री. भोसले यांनी स्वतः फिल्डवर उत्तरत ही कारवाई केली. एलसीबी पी आय श्री. भोसले यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, गुरू कोयडे, श्री. गंगावणे, कृष्णा केसरकर यांनी ही कारवाई सकाळी ३ वा. २१ मिनिटांनी केली.
आरोपींकडून १ किलो ३१० ग्राम चा ३९ हजार रुपयांचा गांजा, एक मोटरसायकल, २ मोबाईल, दोन चिलीम, वजनकाटा, रोख ७०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. एलसीबी पोलीस हवालदार कृष्णा केसरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोवयापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८ (क), २० (ब), २ (ब) प्रमाणे कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बापू खरात करत आहेत.