*कोकण Express*
*मुंबई बस मालक संघटनेच्या शिस्तमंडळाने भाजपा उपाध्यक्ष व माजी खासदार किरीट सोमय्या यांची घेतली भेट*
*बेकायदेशीर “इ” चलनचे दंड माफ करण्यासंदर्भात केली चर्चा*
*मुंबई*
आज मुंबई बस मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने भ.ज. पक्षाचे उपाध्यक्ष व माजी खासदार श्री. किरीट जी सोमय्या यांची भेट घेतली, या प्रसंगी खलील ठळक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे श्री किरीट सोमय्या साहेबांनी आश्वासन दिले. *ठळक मुद्दे* : 1 *)2017 पासून ते आज पर्यंत बेकायदेशीर e चलन च्या ओझ्याखाली गाडलेगेलेल्या बस मालकांना व्यवसायात पुन्हा नवसंजीवनी मिळावी म्हणून उत्तर प्रदेश सरकारचे अध्यादेशाच्या आधारावर महाराष्ट्र रण्यातील तमाम बसेसवर असलेल्या बेकायदेशीर e चलन चे दंड माफ करण्यात यावे अशी मुख्य मागणी केली.2) संपूर्ण मुंबई मध्ये खाजगी बस थांबा / पिकअप/ ड्रॉपिंग पॉईंटनसल्यामुळे खाजगी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हाल सोसावे लागत आहे. 3) प्रवाशांना पिकअप/ड्रॉप करताना u/s283 बस वर होणारे दंडात्मक कारवाईमुळे बस मालकांना खूप मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे व व्यवसाय करणे कठीण होऊन, बस चालकाला २/३ तास पोलीस चौकीत बसवून ठेवून नंतर गुन्हा दाखल करून जामिनावर सोडने अश्या नाहक त्रासमुळे चालकाचे मनोबल तुटत आहे. 4) बस मालकांना कायदेशीर बस पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देणे