*कोकण Express*
*तळेरे येथील जिल्हास्तरिय चित्रकला स्पर्धेत खुल्या गटातून आदेश चौकेकर तर मोठ्या गटातून दुर्वा केळूसकर यानी प्रथम क्रमांक पटकावला*
*कासार्डे ; संजय भोसले*
भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाचे नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व डॉ.अनिल नेरुरकर M.D (अमेरिका) प्रेरित प्रज्ञांगण तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. या उपक्रमास जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खुल्या गटात आदेश चौकेकर तर मोठ्या गटात दुर्वा केळुसकर यांनी प्रथम क्रमांक मिळविले.
राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत “Catch the Rain-3.0″ नुसार जेव्हा पाऊस पडेल, जिथे पडेल, जसा पडेल’ त्या पाण्याचे संवर्धन करणे, त्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यासाठी संपूर्ण भारतभर असे उपक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व प्रज्ञांगण तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून याविषयीची जनजागृती करणारा उपक्रम पार पडला.
यावेळी शिरगाव हायस्कूलचे शिक्षक विनोद चौगुले, श्री. पावरा, कणकवली हायस्कूलचे कला शिक्षक प्रसाद राणे, श्रावणी कंप्यूटरचे संचालक सतीश मदभावे आणि सौ. श्रावणी मदभावे आदी मान्यवर उपस्थित होते.
Hide quoted text
सध्याचा चिंतेचा विषय म्हणजेच पाण्याचे कमी होणारे प्रमाण. पाणी वाचवले नाही तर भविष्यात खूप गंभीर परिस्थिती ओढवेल. याबद्दल जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक प्रयत्न केला की आत्ताच्या तरुण पिढीमध्ये याबद्दलचे गांभीर्य लक्षात यावे. कला शिक्षक प्रसाद राणे यांनी विद्यार्थ्यांना “पाणी वाचवा आणि प्लाटिक चा वापर कमी करा असे आवाहन केले”. “जल संवर्धन ही काळाची गरज आहे अन्यथा अनेक परिणामांना सामोरे जावे लागेल”, असे प्रतिपादन केले.
या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी “पाणी संवर्धन आणि रक्षण” या विषयावर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला संपूर्ण जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण विनोद चौगुले यांनी केले.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
चित्रकला स्पर्धा (मोठा गट) : प्रथम – दुर्वा रुपेश केळुसकर (कणकवली), द्वितीय – अर्पिता राजेंद्र बुचडे (कलमठ), तृतीय – निशांत प्रसाद राणे (कणकवली), उत्तेजनार्थ – उत्कर्ष विश्वनाथ यादव (नाधवडे), सिद्धी महेश पाटील (खारेपाटण), वैष्णवी दिनकर गिरी ( कासार्डे )
चित्रकला स्पर्धा (खुला गट) : प्रथम – आदेश अनिल चौकेकर (शिरगाव), द्वितीय – अक्षय अनिल चौकेकर (शिरगाव), तृतीय क्रमांक: प्राची अंकुश मेस्त्री (शिरगाव), उत्तेजनार्थ – विक्की संजय कसले (नाधवडे), साक्षी प्रकाश तांबे (नाद गवणे), पार्थ परशुराम बेळणेकर (कणकवली)
या विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.