*कोकण Express*
*कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक 27 जून रोजी*
*आमदार नितेश राणेंची शासकीय यंत्रणेला दक्षतेची सूचना*
*कणकवली ः प्रतिनिधी*
23 जूनपासून सुरू झालेल्या पावसानंतर हवामान खात्याने सिंधुदुर्गात जोरदार पर्जन्यवृष्टी जाणि वादळाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी आमदार नितेश राणे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दक्षतेची सूचना दिली आहे. आमदार नितेश राणे यांच्या सुचनेची दखल घेत कणकवली देवगड वैभववाडी कणकवली वैभववाडी तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक 27 जून रोजी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता कणकवली तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. आपल्या मतदारसंघातील जनतेला अतिवृष्टी आणि आपत्ती काळात त्रास होणार नसल्याचा विश्वास आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला असून आपत्ती व्यवस्थापन बाबत जनतेच्या काही तक्रारी अथवा सूचना असल्यास 27 जून रोजीची बैठकीत मांडाव्यात असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.