*कोकण Express*
*रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल मार्फत कळी उमलताना कार्यक्रमाचे माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आयोजन*
*रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल मार्फत MHM अंतर्गत किशोरवयीन मुलीं व माता यांच्यासाठी मार्गदर्शन पर कळी उमलताना या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि. २७ जून २०२३ रोजी दुपारी २.३० ते ४.०० या वेळेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेत करण्यात आले आहे.*
*कळी उमलताना म्हणजेच मुलगी वयात येताना*
*मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांच्या अंतर्बाह्य मन व शरीरातील होणारे बदल व त्या वयात त्यांनी व त्यांच्या मातांनी घ्यावयाची काळजी यासंदर्भात इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी रोटरीच्या MHM अंतर्गत कळी उमलताना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात हायस्कूल मधील किशोरवयीन विद्यार्थिनी व त्यांच्या माता यांना रो. डॅा. अश्विनी नवरे मॅडम या साध्या व सोप्या भाषेत आहार , शारीरिक स्वच्छता, मासीकपाळी व्यवस्थापन , स्पर्शज्ञान व मोबाईल वापराचे फायदे – तोटे इत्यादी विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत व त्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.*
*हायस्कूल मधील सर्व विद्यार्थीनींना रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल मार्फत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येते. बऱ्याच शाळांना रोटरीने सॅनिटरी नॅपकिन डिझॅाल मशीन दिल्या आहेत. रोज वर्तमानपत्र वाचले की मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या आपण वाचतो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याची कारणे वेगवेगळी आहेत. हे कुठेतरी कमी व्हावे असे वाटते म्हणूनच किशोरवयीन मुलीं व त्यांच्या माता यांच्या मध्ये जागरूकता यावी ह्यासाठी हा मार्गदर्शनपर कार्यक्रम रोटरी मार्फत कनेडी हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाचा प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी व माता पालक यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी यांनी केले आहे.*
*मुख्याध्यापक/ प्राचार्य*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनियर कॉलेज कनेडी*