*कोकण Express*
*बेळणे खुर्द.आई पावणादेवीचा वर्धापन दिन उद्या…!
साधेपणाने होणार साजरा…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
बेळणे खुर्द.आई पावणादेवीचा वर्धापन दिन उद्या साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.कोविड संसर्गामुळे साध्या पद्धतीत साजरा करण्याचा निर्णय बेळणेगावच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सकाळी आई पावणादेवीची पूजा,तद्नंतर धार्मिक कार्यक्रम व रात्रौ सुश्राव्य भजने असा कार्यक्रम होणार आहे.
दरवर्षी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.तरी भाविकांनी
कोविड 19 चे शासकीय नियम पाळून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन बेळणे खुर्द.गावच्या वतीने करण्यात आले आहे.