औदूंबर सेवा ट्रस्टचे काम कौतुकास्पद

औदूंबर सेवा ट्रस्टचे काम कौतुकास्पद

*कोकण Express*

*औदूंबर सेवा ट्रस्टचे काम कौतुकास्पद*

*कासार्डे; संजय भोसले*

शांततेसाठी व एकीसाठी वैभववाडी तालुक्यात अग्रेसर असणारे गाव म्हणजे नाधवडे गाव आहे.या गावचे वैशिष्ट म्हणजे गावात किंवा गावाबाहेर काही आकस्मित घटना घडल्यास याच गावातील युवक तसेच नागरिक प्रथम घटनास्थळी बचावासाठी हजर असतात.अशा या सामाजिक शैक्षणिक वारसा असणार्‍या गावात औदुंबर सेवा ट्रस्ट सारखी सामाजिक संस्था दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून याच गावातील गरीब व होतकरु विद्यार्थ्याना मोफत वर्षभर पुरतील एवढ्या वह्या वाटप करुन गावातील सर्व शालेय मुलांना मदतीचा हात दिला आहे.हे कार्य निश्चितच कौतुकास्पद व उल्लेखनीय म्हणावे लागेल असे प्रतिपादन वैभववाडी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण देसाई यांनी व्यक्त केले.

नाधवडे येथील प.पु.श्री.प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट व ञिमुर्ती मिञ मंडळ मुंबई यांच्या वतीने नाधवडे गावातील सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.गावात शिक्षणापासुन कोणी वंचित राहु नये यासाठी
मोफत वह्या, गणवेश ,परीक्षा फी यासारख्या शैक्षणिक सुविधा ही दिल्या आहेत.

यावेळी वैभववाडी पोलिस निरीक्षक सागर खंडागळे ,नाधवडे उपसरपंच श्रीरंग पावस्कर,वैभववाडी माजी सभापती बाप्पी मांजरेकर, जि.प सदस्य सुधिर नकाशे,माजी उपसभापती बंड्या मांजरेकर,जिल्हा शांतता कमिटी सदस्य परशुराम इस्वलकर,भाजपा मेडीया प्रमुख बाबा कोकाटे,बबन कुडतरकर,कलमट गावचे ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर, सिंधूदूर्ग सहकारी बॅंकेचे अधिकारी प्रल्हाद कुडतरकर, माजी उपसरपंच सुर्यकांत कांबळे, शंकर सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन संतोष पेडणेकर, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबु तावडे,शंकर प्रासा.सेवा सोसायटी माजी चेअरमन रविंद्र गुंडये,सचिव प्रदिप पार्टे,सुहास सावंत,रमांकात पांचाळ,ग्रा.प.सदस्य प्रफुल कोकाटे,रोहीत पावस्कर, चिंतामणी शिंदे ,जग्गनाथ शिंदे ,प्रकाश पाष्टे ,भालचंद्र ताम्हणकर,विठोबा नारकर, अनंत टोळवणी ,औदुंबर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नारकर, खजिनदार रुपेश कुडतरकर,दिपक सु.कुडतरकर, ग्रामविकास मंडळांचे खजिनदार रविंद्र खांडेकर,प्रफुल घाडी,प्रविण गुरव,योगेश शेट्ये,संतोष सावंत, श्रीकृष्णा नारकर,संजय कुडतरकर,केशव नारकर योगेश घाडी,अंकित शेट्ये,दया तानवडे,प्रल्हाद नारकर ,नवलादेवी ब्राम्हणदेव शाळेचे मुख्याध्यापक- संजय पाताडे,शंकर चव्हाण, पंढरीनाथ सावंत,सौ.कदम- चारवाडी शाळा, श्री.बोरकर-केंद्रशाळा श्री.नारकर-बौद्धवाडी शाळा श्री.गोसावी- सरदारवाडी शाळा श्री.खंडागळे व शिक्षकवर्ग व विध्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वैभववाडी पोलिस निरिक्षक सागर खंडागळे यांनी उपस्थित विध्यार्थ्याना सोशल मिडीया क्राईम व त्यांचा होणारा वापर याबाबत मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!