*कोकण Express*
*कासार्डे हायस्कूलमध्ये ‘जागतिक योग दिन’ रोमहर्षक प्रात्यक्षिकांनी साजरा…*
*कासार्डे: संजय भोसले*
कणकवली कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कासार्डे या ठिकाणी ‘जागतिक योग दिन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगाच्या बहारदार प्रात्यक्षिकांनी उत्साहात साजरा झाला.
या उपक्रमाला कासार्डे शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, पदाधिकारी व माजी सैनिक रविंद्र पाताडे, विद्यालयचे प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक नारायण कुचेकर, विद्यालयचे जेष्ठ शिक्षक तथा योगाचे मार्गदर्शक शिक्षक संजय भोसले,योगा मार्गदर्शिका कु. प्रियांका सुतार, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंदानी भाग योगाचा सराव केला.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी योगा मार्गदर्शक संजय भोसले व शिक्षिका कु.प्रियंका सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली योगाच्या प्रस्ताविक हालचाली, प्राणायाम, विविध
योगासनांचा सराव करीत आजचा योगदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न केला.
तसेच विद्यालयातील विद्यार्थी कल्पेश निकम,कु.दुर्वा पाटील,कु.सेजल चव्हाण (सर्व इ.८वी ब) व मयुर हडशी इ.१०वी आदीं राज्यस्तरीय योगा खेळाडूंनी योगाची अतिशय मनमोहक व बहारदारपणे प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितींची मने जिंकली.
दरम्यान पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचे आणि व्यामाचे महत्त्व विशद केले.
तर योगा मार्गदर्शक संजय भोसले व प्रियंका सुतार यांनी प्रत्येक आसनांची शास्त्रोक्त पद्धतीने माहिती सांगून मानवी जीवनात योगाचे महत्त्व स्पष्ट केले.
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी मानलेल्या आभाराने सलग दोन तास सुरू असलेल्या या उपक्रमाची सांगता झाली.