*युवा संदेश प्रतिष्ठान, कनेडी सांगवे तर्फे मोफत वह्या वाटप व SSC/HSC विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा*

*युवा संदेश प्रतिष्ठान, कनेडी सांगवे तर्फे मोफत वह्या वाटप व SSC/HSC विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा*

*कोकण Express*

*युवा संदेश प्रतिष्ठान, कनेडी सांगवे तर्फे मोफत वह्या वाटप व SSC/HSC विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा*

युवा संदेश प्रतिष्ठान, कनेडी सांगवे तर्फे बुधवार दिनांक २१/०६/२०२३ रोजी सकाळी १० वाजता ज्ञानदीप सांस्कृतिक भवन कनेडी येथे SSC/HSC परीक्षा २०२३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच जिजाऊ प्रतिष्ठान तर्फे व युवा संदेश प्रतिष्ठान कनेडी सांगवे यांच्या माध्यमातून प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमास माजी जि. प. अध्यक्ष सन्मा. श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जि. प. अध्यक्षा सन्मा. सौ. संजना संदेश सावंत, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे सन्माननीय पदाधिकारी, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सदस्य, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे .*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!