जागतिक योग दिनानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून योग शिबिराचे संपन्न

जागतिक योग दिनानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून योग शिबिराचे संपन्न

*कोकण Express*

*जागतिक योग दिनानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून योग शिबिराचे संपन्न*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

जागतिक योग दिनानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याचा शुभारंभ गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.
21 जून 2023 हा जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.या योग दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा शुभारंभ सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या शुभहस्ते व विस्तार अधिकारी गजानन धर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करुन संपन्न झाला.या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी योगशिक्षक म्हणून डॉ.सचिन पुराणिक व डॉ.सौ.संपदा पुराणिक यांनी काम पाहिले.या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करत असताना गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी आरोग्य चांगले राहण्यासाठी योगासने करणे ही काळाची गरज आहे असे सांगत त्यात सातत्य ठेवा जेणेकरून तुमचे आरोग्य सुदृढ राहील असे आवाहन केले.तसेच हे शिबिर आयोजित केल्याबद्दल ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेचे ही त्यांनी भरभरून कौतुक केले.या शुभारंभ प्रसंगी सरपंच सौ मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव,ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!