प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबवावी —- वेंगुर्ले भाजपा ची मागणी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबवावी —- वेंगुर्ले भाजपा ची मागणी

*कोकण Express*

*प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबवावी —- वेंगुर्ले भाजपा ची मागणी*

*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तहसीलदार व कृषी अधिकारी यांचे लक्ष वेधले*

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत चौदाव्या हप्त्याच्या लाभ वितरणाची कार्यवाही सद्ध्या सुरू आहे . केंद्र सरकारने योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्याने ई – केवायसी ,बॅक खाते आधार शी संलग्न करणे व लॅड सिलींग करणे या बाबी अनिवार्य केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात येऊन या सर्व गोष्टी करणे शक्य नसल्याने बरेच शेतकरी ह्या योजनेच्या लाभापासून वंचित रहाणार आहेत.
आता राज्य सरकारची नमो शेतकरी महा सन्माननिधी ही पण योजना सुरू होणार आहे व प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात आणखी ६००० रु. जमा होणार आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक १२००० रु.नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ही विशेष मोहिम राबवावी अशी मागणी भाजपा च्या वतीने तहसीलदार ओंकार ओतारी व कृषी अधिकारी निरंजन देसाई यांच्या जवळ करण्यात आली .
तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या योजनेतील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कृषी सहायक , ग्रामसेवक , तलाठी तसेच पोस्ट खात्यातील कर्मचारी यांना एकत्रित उपलब्ध करून प्रलंबित ई – केवायसीची पुर्तता करावी अशी मागणी केली .
यावेळी तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी ताबडतोब याची कार्यवाही सुरू होईल असे अभिवचन भाजपा शिष्टमंडळाला दिले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , दादा केळुसकर ,परबवाडा उपसरपंच पपु परब , पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील , शक्ती केंद्र प्रमुख ताता मेस्त्री , सोशल मीडिया चे राजु परब , ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर , रामु परब , नितीन कोचरेकर , माजी उपसरपंच जयवंत तुळसकर , अनंत नेरुरकर , पांडुरंग सावंत , पंढरीनाथ राऊळ , लक्ष्मण वेतोरेकर , कृष्णाजी सावंत , वायंगणी माजी सरपंच सखाराम केळजी , संतोष सावंत , सुनील प्रभू खानोलकर , सौरभ नाईक , अंकुश पवार , ललीता पवार इत्यादी भाजपा पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!