लेखिका वृंदा कांबळी यांच्या साहित्यावर पिएचडीच्या प्रबंधात अभ्यासपूर्ण लेखन

लेखिका वृंदा कांबळी यांच्या साहित्यावर पिएचडीच्या प्रबंधात अभ्यासपूर्ण लेखन

*कोकण Express*

*लेखिका वृंदा कांबळी यांच्या साहित्यावर पिएचडीच्या प्रबंधात अभ्यासपूर्ण लेखन*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

“कोकणातील लेखिका वृंदा कांबळी यानी आपल्या साहित्यातून आदिमतेचा व गूढतेचा शोधवघेण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो. हा प्रयत्न ठरवून केलेला नाही. पण लेखिका ज्या निसर्गसंपन्न कोकणच्या भूमीत राहातात त्यातील सांस्कृतिक स्पंदने त्यांच्या लेखनात जाणवत राहातात. त्यांच्या साहित्यात त्यांच्या अवती भवती वावरणारी माणसे आढळतात. सर्व वयाची, विविध व्यवसाय करणारी पात्रे असतात. असे वाटत राहाते की आपण याना भेटलोय. सर्व पात्रे आपली वाटतात. भाषेचे पदरही एक बोली भाषेचे व निवेदनाची भाषा नागरी. यामुळे त्यांच्या लेखनात वास्तवता येते. त्यानी आपल्या लेखनातून प्रादेशिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहाण्याची दृष्टी मांडली. ”
लेखिका सौ. वृंदा कांबळी यांच्या साहित्याबद्दल रत्नागिरी येथील कवी, लेखक, पत्रकार प्रा. शंकर जाधव याना बेळगांवच्या राणी चेनम्मा विद्यापिठाने जाहीर केलेले पिएचडीच्या प्रबंधात वरील उल्लेख केला आहे. 1960 नंतरच्या कोकणातील लेखिकांच्या साहित्याचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. कोकणातील प्रतिभावंतांचे साहित्य काहीसे दुर्लक्षित होते. या लेखिकांच्या साहित्याची दखल समीक्षकानी फारशी घेतली नाही. याची खंत प्रा. जाधव याना होती. कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथेवते मराठी विषयात प्रथम येऊन त्याना रावसाहेब गोगटे गोल्डमेडल मिळाले. ‘ शब्दवेणा ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्याना डाॅ. बाबूराव गायकवाड व डाॅ. विनोद गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
सौ. वृंदा कांबळी यानी आपल्या साहित्यावर संशोधनात्मक लिहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सौ. वृंदा कांबळी यांची पाच कथासंग्रह, पाच कादंबऱ्या, दोन ललित अशी बारा पुस्तके प्रकाशित असून यातील सहा पुस्तकांच्या दोन दोन तीन तीन आवृत्या निघाल्या. दोन कादंबऱ्या व एक कथा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!