*कोकण Express*
*श्री गोमय गणेश मूर्ती घरोघरी पूजली जावी हा संकल्प. महेश संसारे*
श्री गोमय गणेश मूर्ती घरोघरी पूजली जावी हा संकल्प करून गावागावातील मूर्तिकार देशी गाईच्या गोमयाचा वापर करतील यासाठी सर्वांच्या सहभागातून प्रयत्न व्हावेत असे आवाहन प्रवण कंपनीचे अध्यक्ष यांनी आज प्रशिक्षण शुभारंभ प्रसंगी केले. यापुढे प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबवून देशी गाईच्या शेणाची किंमत जास्तीत जास्त कशी वाढेल आणि देशी गोपालकाला देशी गाय विकण्या ऐवजी तिच्या शेणातूनच तिचा पालन पोषणाचा खर्च भागवीता आल्यास गाय विकण्याची वेळच शेतकऱ्यांवर येऊ नये याची काळजी घेण्याचे प्रयत्न यापुढे सतत केले जातील आज देशी गाईच्या गोमयापासून पंचगव्य साबण दंतमंजन,धूपबत्ती,गोवऱ्या पणत्या , विविध प्रकारच्या राख्या भिंतीवरील आर्टिकलं वैदिक पेंट प्लास्टर टाईल्स फरशी अशी शेकडो उत्पादन बनत आहेत आणि वैज्ञानिक दृष्टीने ती पर्यावरण आणि आरोग्यासाठी अंत्यन्त महत्वाची असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे देशी गायीला किती महत्व आहे याचा विचार व्हावा यातील व्यवसायिक संधी आत्मसात करावी असे कळकळीचे आवाहन ही महेश संसारे यांनी केले प्रवण फार्मर प्रोडूसर कंपनी लि वैभववाडी,सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघ आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने गोमय गणेश मूर्ती प्रशिक्षण आज सिद्धिविनायक हॉल माजगाव येथे सपन्न झाले यावेळी प्रास्ताविक मूर्तिकार संघ अध्यक्ष बापूसाहेब सावंत यांनी केले प्रशिक्षणात 20 मूर्तिकार सहभागी झाले होते यावेळी कंपनीचे हितचिंतक सभासद श्री शैलेश सावंत यांनी देशी गायीचं महत्व विषद केले प्रशिक्षक दत्ताराम मठकर वेंगुर्ला मूर्तिकार संघ सचिव उदय राऊत व इतर संचालक उपस्थित होते

