*कोकण Express*
*माजी सरपंच उल्हास कल्याणकर यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत केली आत्महत्या*
*गंभीर भाजल्याने झाला यांचा मृत्यू : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दशक्रोशीतील नागरिकांची धाव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील तळेरे गावचे माजी सरपंच उल्हास कल्याणकर (४२) यांनी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची
घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर उल्हास कल्याणकर यांना भाजलेल्या स्थितीतच कणकवली उपजिल्हा रुग्णालय दाखल
करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..
तळेरे गावचे माजी सरपंच म्हणून उल्हास कल्याणकर यांनी काम केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. या आत्महत्येची नेमके कारण समजू शकले नाही. पोलीसानी पंचनामा केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

