*कोकण Express*
*माणगाव येथील दत्तमंदिरात १९ तारखेला श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज पुण्यतिथी…*
*माणगाव : प्रतिनिधी*
येथील माणगाव दत्तमंदीरात सोमवार ता. १९ ला श्री. प.पु.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम पुढील प्रमाणे:
श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी अभिषेक पूजा, लघुरूदाभिषेक, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, श्री.चे जन्मस्थानी सकाळी अभिषेक पूजा, यतिआराधना, तीर्थराजपूजन, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, या कार्यक्रमाला तरी सर्व भाविक भक्तगणानी उपस्थित राहावे,
असे आव्हान श्री विश्वस्त मंडळ दत्त मंदिर माणगाव या देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री.प.प.वल्लभानंद सरस्वती, श्री शेत्र गाणगापूर उपस्थित राहणार आहे.