*कोकण Express*
*पिंगुळी येथील पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या वस्तुसंग्रहालयाला २५ लाख अनुदान*!
*आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी केले अभिनंदन *!
पिंगुळी येथील ठाकर लोककलेचे जनक पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी ठाकर समाजाची लोक कला साता समुद्रापार नेली आज पर्यटक सुध्दा मोठ्या प्रमाणात या संग्रहालयाला भेटी देत असताना अजुन ठाकर लोककलेच्या वस्तू संग्रहालय मोठ्या प्रमाणात उभे रहावे यासाठी परशुराम गंगावणे यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या कडे गेल्या दोन वर्षांपासून मागणी केली होती त्या वेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी ही मागणी रास्त असल्याने ती देण्यात यासाठी जोर धरला होता सदर निधी मंजूर झाल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ नगराध्यक्ष मंदार शिरसाट, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ ओबिसी शिवसेना शहरप्रमुख राजु गवंडे, युवा सेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले तर आमदार वैभव नाईक यांनी भ्रमण ध्वनी द्वारे श्री गंगावणे यांचे अभिनंदन करुन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र आणि देशात नाव पुरस्कारांच्या माध्यमातून नेले आता ठाकर समाजाची लोककला व वस्तुसंग्रहालय पर्यटकांना पर्वणी ठरेल असे गौरवोद्गार आम नाईक यांनी काढुन शुभेच्छा दिल्या