*कोकण Express*
*श्री मोदी@ ९ अभियान संगमेश्वर भाजपाचे संयुक्त मोर्चा संमेलन संपन्न*
*देवरुख : प्रतिनिधी*
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा शासनकाळ हा संपूर्ण भारताच्या दृष्टीने सुवर्णकाळ असल्याचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विश्लेषकांनी अनेकवेळा नमूद केले आहे. देशाची अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, संरक्षण व्यवस्था यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे श्रेय मा. मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारला द्यावेच लागेल. इतकेच काय भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणात ताठरपणा आणून आज जागतिक राजकारणात देशाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देण्याचे कामदेखील मोदी सरकारचेच. भारत देशाला विश्वगुरुपदी विराजित करण्यासाठी मोदी सरकार अव्याहत सेवारत आहे.
“मोदीजींनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेऊन आता ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता वेळ आहे ती सिंहावलोकन करण्याची केलेला विकास आणि अद्याप राहिलेला विकास याबाबत आत्मचिंतन करण्याची. या मतदारसंघात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकांनी मोठ्या विश्वासाने भाजपाच्या ताब्यात दिल्या आहेत. अजूनही मोठे यश बाकी आहे. याचसाठी ‘मोदी@ अभियानांतर्गत संगमेश्वर तालुका भाजपा कार्यालय देवरुख येथे संयुक्त मोर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले.” असे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी सांगितले.
या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी (द) जिल्हा संघटन सरचिटणीस श्री. राजेशजी सावंत यांनी मार्गदर्शन केले. तर चिपळूण- संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांनी आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला. केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना सर्वसामान्य लाभाथ्र्यांपर्यंत पोहचविण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
सोशल मिडीया, युवा, महिला, कामगार, ओबीसी, वाहतूक, शेतकरी, उद्योग आदी मोर्चाचे तालुका संयोजक, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते या
बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीसाठी ओबीसी जिल्हा अध्यक्ष श्री. अभिजित शेट्ये तसेच महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे यांनी मेहनत घेतली व बैठक यशस्वी केली.