*कोकण Express*
*कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अक्षता खटावकर*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
महाविकास आघाडीच्या नगरसेविका अक्षता अनंत खटावकर यांनी आज कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. कुडाळ न.पं. कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळू, मुख्य अधिकारी अरविंद नातू यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
नगराध्यक्ष पदासाठी अक्षता खटावकर यांचे एकच नामनिर्देशन पत्र आले होते. त्यामुळे या पदासाठी खटावकर यांची बिनविरोध निवड झाली होती. याबाबतची अधिकृत घोषणा आज विशेष सभेदरम्यान करण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, किरण शिंदे, उदय मांजरेकर, सई काळप, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, संतोष शिरसाट, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट, अतुल बंगे, बबन बोभाटे, सचिन काळप, गुरू गडकर आदी उपस्थित होते…