सिंधुरत्न योजनेचा निधी प्राप्त – प्रमोद जठार

सिंधुरत्न योजनेचा निधी प्राप्त – प्रमोद जठार

*कोकण Express*

*सिंधुरत्न योजनेचा निधी प्राप्त – प्रमोद जठार*

*उर्वरित निधी देण्याबाबत श्री. जठार यांची पालकमंत्र्यांकडे मागणी…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सिंधु रत्न समृद्ध योजनेच्या विविध विकास कामांतर्गत सिंधुदुर्ग – जिल्ह्याला 2022 23 या वर्षाकरिता 50 कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला होता. माजी आमदार प्रमोद जठार यांनी याबाबत पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सदर निधी पैकी प्राप्त झालेल्या निधी वगळून अन्य निधी देण्याबाबत शिफारस करण्याची मागणी केली होती. 202223 मध्ये 23.32 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. तर उर्वरित निधी देण्याबाबत श्री जठार यांच्या मागणीनुसार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत शिफारस करून अर्थमंत्र्यांना तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला होता. एकूण तीन वर्षाकरिता दीडशे कोटींचा निधी अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित होता. त्यातील 9.2 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे अशी माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सिंधुदुर्ग समृद्ध योजनेचे कार्यकारी समितीचे सदस्य प्रमोद जठार यांनी दिली. तसेच उर्वरित 90.98 कोटीचा निधी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीला वर्ग करावा अशी मागणी श्री जठार यांनी केली आहे. तसेच याबाबत जिल्हा नियोजन अधिकान्यानी देखील राज्याच्या उपचिवांना पत्रव्यवहार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!