मालवणात शिक्षण मंत्र्यांचा निषेध; जोरदार घोषणाबाजी. शिक्षक प्रश्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक

मालवणात शिक्षण मंत्र्यांचा निषेध; जोरदार घोषणाबाजी. शिक्षक प्रश्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक

*कोकण Express*

*मालवणात शिक्षण मंत्र्यांचा निषेध; जोरदार घोषणाबाजी. शिक्षक प्रश्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक*

*मालवण ः प्रतिनिधी*

तालुक्यातील अनेक शाळामध्ये एकही शिक्षक उपलब्ध नाही. तसेच अनेक शाळेत पटसंख्ये नुसार शिक्षक नाहीत. राज्यसरकारने शिक्षकांच्या बदल्या केल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग सह मालवणात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त यांनी मालवण पंचायत समिती समोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले भर उन्हात बसून आदोलन छेडण्यात आले. आ. वैभव नाईक देखील उन्हात बसले होते.

मालवणचे गटशिक्षणाधिकारी सर्व शाळाना शिक्षक दिल्याचे सांगून दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. तर या आंदोलनावेळी गटविकास अधिकारी अनुपस्थित आहेत. शिक्षक प्रश्नी जाब विचारायला येणार हे माहिती असताना गटविकास अधिकारी उपस्थित राहिले नसले तरी जोपर्यंत गटविकास अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. तासाभराने गटविकास अधिकारी दाखल झाले. त्यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या १५ दिवसात शिक्षक प्रश्न न सुटल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला.

यावेळी शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालेच पाहिजेत शिक्षण मंत्र्यांचा निषेध असो शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो! खोके सरकारचा निषेध असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक पंकज सादये, उप तालुका प्रमुख गणेश कुडाळकर, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, युवासेना समन्वयक मंदार औरसकर, महिला तालुका प्रमुख श्वेता सावंत, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, सन्मेष परब, बंडू चव्हाण, उमेश मांजरेकर, भगवान लुडबे, बाळ महाभोज, अमोल वस्त, विनायक परब, कमलाकर गावडे, अमीत भोगले, अक्षय रेवंडकर, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, सिद्धेश मांजरेकर, नितीन घाडी, लता खोत, राजू नार्वेकर, प्रदीप लुडबे, सुहास, नरेश हुले, संजना रेडकर, अनुष्का गावकर, समीर लब्दे, गौरव वेलक मिनेश चव्हाण, नितीन राऊळ, अनंत पाटकर, विजय पालव, श्रीकृष्ण पाटकर, भाऊ चव्हाण, चंदू खोबरेकर, बाळकृष्ण मसुरकर, विक सरनाईक, रवींद्र साळकर, उदय दुखंडे, हेमंत मोंडकर, प्रदीप सावत, युवराज मेस्त्री, सुनील सावंत, अनंत पोईकर, अबाजी सावंत, वि परब, नितीन घाडी, संदीप सावंत, दत्ता पोईपकर, अक्षय भोसले, संतोष कदम, यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!