घरावर झाड पडून नुकसान

घरावर झाड पडून नुकसान

*कोकण Express*

*घरावर झाड पडून नुकसान*

*आचरा देवूळवाडी येथील घटना पेंडूरकर कुटुंबीय सुदैवाने बचावले*

*आचरा : प्रतिनिधी*

मंगळवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वा-यासह आलेल्या पावसामुळे देवूळवाडी येथील नवलनाथ पेंडूरकर यांच्या घरापाठीमागे असलेल्या आंबा कलमाची मोठी फांदी मोडुन पडल्याने पडवीचे नुकसान झाले. या फांदी मुळे दोन माडही मोडुन पडले. देव बलवत्तर म्हणूनच यातुन पेंडूरकर कुटुंबीय सहीसलामत बचावले. पोटमाळ्यामुळे पडवीत बाधलेली म्हैस आणि रेडकुहि वाचले. याबाबत महसूल कडून घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा पंचनामा केला. यात सुमारे बेचाळीस हजार सातशे पन्नास रुपयांचे नुकसान झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!