*कोकण Express*
*मालवण बार्शी बसला कुपेरी घाटात अपघात*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटणारी मालवण बार्शी एसटी बस कुपेरीची घाटीत कोसळली आहे. येथील – तीव्र उताराच्या वळणावर चालत्या बसचे स्टेअरींग लॉक झाल्याने सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात चालकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. रस्त्याच्या खाली १२ फुट कोसळून ही बस दोन वेळा गटांगळ्या खाऊन उभी राहिली, नशीब बलवत्तर म्हणून एवढ्या भिषण अपघाता नंतरही कुणाला मोठी दुखापत झाली नाही. बसचालक श्री. सांगळे यांना उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

