शिवसेना आ. वैभव नाईक यांना २८ जूनला रत्नागिरीत हजर राहण्यासाठी नोटीस

शिवसेना आ. वैभव नाईक यांना २८ जूनला रत्नागिरीत हजर राहण्यासाठी नोटीस

*कोकण Express*

*शिवसेना आ. वैभव नाईक यांना २८ जूनला रत्नागिरीत हजर राहण्यासाठी नोटीस*

*पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांची बजावले नोटीस

कणकवली ः प्रतिनिधी*

पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांचे कार्यालय, मारुती मंदीर, नाचणे रोड रत्नागिरी येथे चौकशी कामी २८ जूनला हजर राहण्यासाठी आम वैभव विजय नाईक नोटीस बजावण्यात आली आहे. त्या नोटीसीमध्ये उघड चौकशी कामी जबाब नोंद करणेसाठी उपस्थित रहावे, असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून आ. वैभव नाईक यांची उघड चौकशी मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. सदर उपड चौकशीच्या अनुषंगाने दिनांक ०१ जानेवारी २००२ ते २९ स्पटेंबर २०२२ या कालावधीतील आपले उत्पन्न, सर्च व मालमत्ता याबाबत मत्ता व त्याचे ते फॉर्म्स त्यामध्ये नमुद मुद्दयांच्या १ अनुषंगाने त्वरीत भरून देणेसाठी व मत्ता सामित्वाचे १ ते ६ फॉर्म मधील आपण दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपला जबाब नोंद करणेसाठी ६ वेळा पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय पत्रान्वये समक्ष व ई मेलव्दारे कळविण्यात आलेले आहे. परंतु नमुद दिनांकास आपण उपस्थित राहिलेले नाहीत, अशी नाराजी या नोटीस मधून व्यक्त केली आहे.

लाच प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून आपले मालमत्तेच्या सुरु असलेल्या उपद चौकशीचे अनुषंगाने आपले उत्पन्न सर्व व मालमत्ता माबाबतची आवश्यक ती माहिती आपणास देण्यात आलेल्या मत्ता व दामित्वाचे १ से फॉर्म तसेच सदर कालावधीतील आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, पोल तन्ना शिट प्रॉफीट अॅन्ड लॉस अफाट डिटेल्स पौडमुलसह इत्यादी माहिती व त्यासंबंधीत कागदपत्रासह आपण दिनांक २८ जून २०२३ रोजी ११.०० वाजता पोलीस उपअधीक्षक सात प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय नाचणे रोड, मारुती मंदीर येथे उपस्थित रहावे, असे नोटीस पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी बजावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!