*कोकण Express*
*सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाका उद्या १४ जून पासून सकाळी ८ वाजल्यापासून होणार सुरू*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका उद्या १४ जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे त्याबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोलमाफी मिळाला खेरीज ओसरगाव टोलनाका सुरू होऊ देणार नाही असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे उद्यापासून टोल नाका सुरू होणार की नाही याबाबत उत्सुकता आहे. ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या कंपनीला देण्यात आले आहे.
१४ जून पासून ही टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३३० रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध केली…
असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने ९५ रुपये मिनी
बस आणि हलकी व्यावसायिक वाहने १५५ रुपये ट्रक आणि बस (२ अॅक्सल): ३२० रुपये व्यावसायिक वाहने ३ अ क्सलसाठी ३५० रुपये मल्टी अॅक्सल ४ ते ६ अक्सल वाहनासाठी ५०५ रुपये. सात किंवा त्याहून जास्त अॅक्सल वाहनांसाठी ६१५ रुपये अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी