*कोकण Express*
*गोवा बनावटीची अवैध ३ लाखा ची दारू जप्त*
*स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदूर्गची करवाई*
*कुडाळ : प्रतिनिधी*
गोवा बनावटीची अवैध दारू घेऊन जाणारी स्कॉर्पिओ मोटार आज ६.३०ला देवसु वन विश्रामगृहा समोर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुगने पकडून ३ लाख ६२ हजार २०० रुपयाची दारू जप्त केली आहे कृष्णा उर्फ राजन रमेश गुरव रा. वसोली, शेडगे बाड़ी ता. कुडाळ, सध्या रा. माजगाव ता. सावंतवाड़ी याला अटक केली आहे. ७ लाख रुपये किमंती ची स्कॉर्पिओ मोटार असा एकुण १० लाख ६२ हजार २०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, यशवंत आरमारकर यांनी केलेली आहे.