*कोकण Express*
*कणकवली नगरपंचायतीला दोन घंटागाड्या झाल्या उपलब्ध*
*कचरा संकलनाचा वेग वाढणार; समीर नलावडे यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील कचरा संकलन करण्याची सुविधा अजून मजबूत होण्याच्या दृष्टीने केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून २५ लाखांचा निधी नगरपंचायतच्या कचरा संकलन वाहना करीता देण्यात आला होता. यामधून दोन घंटागाड्या व एक ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी याकरिता पाठपुरावा केला होता.
समीर नलावडे व बंडू हर्णे यांच्या मागणीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा २४ लाख रुपयांचा निधी दिला होता. दोन कायझन घंटागाड्या उपलब्ध झाल्या असून येत्या दोन दिवसात ट्रॅक्टर देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती समिर नलावडे यांनी दिली. यामुळे कणकवली शहरातील कचरा संकलन करणे अजून सोपे होणार आहे. मंत्री नारायण राणे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नलावडे च हर्णे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.