महसूल यंत्रणा दस्तऐवज सुरक्षित ठेवत नसेल तर जनतेने करायचे काय ?

महसूल यंत्रणा दस्तऐवज सुरक्षित ठेवत नसेल तर जनतेने करायचे काय ?

*कोकण Express*

*महसूल यंत्रणा दस्तऐवज सुरक्षित ठेवत नसेल तर जनतेने करायचे काय ?*

*परशुराम उपरकर यांचा सवाल, सुत्रधाराला अटक का नाही?*

*कणकवली ः प्रतिनिधी*

वेंगुर्ला तालुक्यातील जमिनी बाबतचे १९५६ सालापासूनचे महसूल दस्तऐवज गायब झाले आहेत, असा आरोप करतानाच शेतकरी आणि जनतेची महत्वाची महसूल कागदपत्रे जर महसूल यंत्रणा सुरक्षित ठेवत नसेल तर सामान्य जनतेने करायचे काय ? असा सवाल मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे..

कणकवली येथिल संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परशुराम उपरकर म्हणाले, वेंगुर्ला तहसीलदार कचेरी लगतच पोलिस ठाणे आहे. मात्र, तरीही जुन्या कचेरीच्या आवारातून वेंगुर्ला तालुक्यातील जमिनीबाबतचे फेरफार दस्तऐवज, टेम्पो भरून नेण्यात आले. त्यामुळे १९५६ सालापासूनचे महसूल दस्तऐवज गायब झाले आहेत. त्यातील काही कागदपत्रे महसूल यंत्रणेला प्राप्त झाल्याची माहिती वेंगुर्ला तहसीलदार यांनी दिली. ही कागदपत्रे गायब होण्यात निश्चितच काही तरी काळेबेरे आहे, असा आरोप परशुराम उपरकर यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!