*कोकण Express*
*राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये !*
*कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांचा इशारा*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि औरंगजेब नेता म्हणून प्रिय असणाऱ्यांना आपल्या नेत्याची औरंगजेबाबरोबर केलेली तुलना मात्र झोंबते. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने आणि कार्यकत्यांनी निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करू नये अन्यथा आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी दिला आहे.