कोकण कृषि विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज- कुलगुरु डॉ. संजय भावे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे नवनियुक्त १६ वे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी आज आपल्या कुलगुरु

कोकण कृषि विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज- कुलगुरु डॉ. संजय भावे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे नवनियुक्त १६ वे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी आज आपल्या कुलगुरु

*कोकण Express*

*कोकण कृषि विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज- कुलगुरु डॉ. संजय भावे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे नवनियुक्त १६ वे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी आज आपल्या कुलगुरु*

पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ. संजय भावे यांनी कोकण कृषि विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांच्या सहकार्यांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती श्री. रमेश बैस यांनी डॉ. संजय भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. त्यांचा पदभार स्विकारणे व स्वागत व सत्कार समारंभ विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजित करण्यात आला. सुरुवातीला सकाळी ८.३० वा. डॉ. भावे यांनी केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. केळसकर नाका येथून डॉ. भावे यांची ढोल, ताशाच्या गजरात वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ठिक ११.०० वाजता विद्यापीठाच्या ग्रंथालयातील डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांनी आपल्या कुलगुरु पदाचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर विश्वेश्वरख्या सभागृहात स्वागत व सत्कार समारंभाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला दापोली तालुक्यातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून डॉ. भावे सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार डॉ. चंद्रकात (भाई) मोकल, माजी आमदार संजयराव कदम, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष श्री. केदार साठे, नगराध्यक्षा सौ. ममता मोरे यांनी डॉ. भावे यांना सदिच्छा व शुभेच्छा देऊन विद्यापीठाने पुढील पाच वर्षात ध्यावयाच्या विविध उपक्रमाविषयी आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काय करता येईल यावर मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाला डॉ. भावे यांचे पहिले शिक्षक प्रा. जी. ए. सावंत सर यांनी डॉ. भावे यांच्या लहानपणीच्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. यानंतर डॉ. भावे सर आणि सौ. स्नेहल भावे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ. संजय भावे यांनी हा भावनाविवश कार्यक्रम पाहून भारावून जात कुलगुरुपदाच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव झाली असून आपल्या सर्वांना मिळून काम करावे लागेल. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आणि प्रचंड मेहनत करण्याची वृत्ती असल्यामुळे मला हे काम करणे जड जाणार नाही अशी अशा व्यक्त केली. यश मिळाले तर ते तुमचे सर्वांचे असेल आणि अपयशाची पूर्ण जबाबदारी स्वतःची असेल असे सांगितले. यावेळी या कुलगुरू पदापर्यंत पोहोचण्यामध्ये घरची माणसे, सासरची मंडळी आणि मित्र मंडळी यांनी चांगले संस्कार केल्यामुळे आपली चांगली जडण-घडण झाली, त्यामुळे त्याचे फलित म्हणून मी या पदापर्यंत पोहोचलो. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी अतिशय मेहनत करणारे असल्यामुळे गेल्या ३३ वर्षांच्या तेथील अनुभवाचा मला नावलौकिक करण्यामध्ये निश्चितच उपयोग होईल अशी ग्वाही दिली. विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर पोहोचविण्याची जबाबदारी आपण सर्व शास्त्रज्ञांची असून आपण निश्चितच त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही असेही ते म्हणाले. त्याचबरोबर विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावर नामांकनात पहिल्या दहा कृषि विद्यापीठामध्ये माझे विद्यापीठ आणण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ तसेच कुलगुरु महोदयांची मित्रमंडळी, दापोलीतील प्रतिष्ठीत नागरिक, विद्यार्थी, पत्रकार, विविध मिडीया चॅनलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. संजय भावे यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्नेहल भावे, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. प्रमोद सावंत, शिक्षण संचालक, डॉ. प्रशांत बोडके, प्रभारी कुलसचिव डॉ. सतिश नारखेडे, डॉ. व्ही. जी. नाईक, डॉ. पंतगे, डॉ. यशवंत खांदतोड, डॉ. पी. ई. शिनगारे, डॉ. सी. डी. पवार विद्यापीठ अभियंता, श्री. निनाद कुलकर्णी, नियंत्रक, श्रीमती राजश्री पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्ण गंगावणे यांनी डॉ. भावे यांच्यावर केलेली कविता वाद्याच्या संगतीने सादर केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. संतोष वरखडेकर यांनी केले तर आभार प्रभारी कुलसचिव डॉ. सतिश नारखेडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!