कणकवली येथील हॉटेल मंजुनाथचे मालक अनिल शानभाग यांचे निधन

कणकवली येथील हॉटेल मंजुनाथचे मालक अनिल शानभाग यांचे निधन

*कोकण Express*

*कणकवली येथील हॉटेल मंजुनाथचे मालक अनिल शानभाग यांचे निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली येथे गेली ४० वर्ष हॉटेल मंजुनाच्या माध्यमातून लोकांना सेवा देणारे हॉटेलचे मालक अनिल लक्ष्मण शानबाग (वय ६६) यांचे हृदयविकाराने आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मूळ गावी कर्नाटक कुमठे येथे दुःखद निधन झाले आहे. कणकवली शहरात हॉटेल असल्यामुळे त्यांचा मोठा लोकपरिचय होता. त्यांच्या दुःखद निधनाचे वृत्त समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हॉटेल मंजुनाथचे मालक अनिल शानभाग यांचे कणकवली आणि कुडाळ अशी दोन हॉटेल भागिदारीमध्ये चालवत होते. त्यांचा मनमिळावू स्वभाव लोकांना भावणारा होता अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हा हॉटेल व्यवसाय उभारला होता. गेल्या ४० वर्षात अनेक ग्राहकांना सेवा देण्याचे काम त्यांनी केले होते. आता काही दिवसातच पाऊस पडणार असल्याने आज सकाळी कणकवली येथील येथून गावी आईला भेटण्यासाठी निघाले होते. कर्नाटक कुमठे येथे पोहोचताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पक्षात भाऊ, आई, बहीण असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!