*कोकण Express*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वारकरी संप्रदाय कणकवली, हळवळ यांना वाहन प्रदान.!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील हळवल गावासह आजूबाजूच्या परिसरात वारकरी संप्रदायाची मंडळी आहेत. त्यांना हरिपाठ कीर्तनासाठी रात्रीचा वेळी प्रवास करण्यासाठी काही समस्या उद्भवत होत्या. याबाबत त्या वेळचे तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. याची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते चार चाकी वाहन वारकरी संप्रदाय कणकवली हळवळ यांना सुपूर्द केले.
त्यामुळे आता वारकरी संप्रदाय कणकवली, हळवळ यांना रात्री – अपरात्री हरिनामासाठी ये – जा करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय हळवल, कणकवली यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले जात आहेत.
तर वारकरी संप्रदायचे वाहन वारकरी मधुकर प्रभुगावकर, प्रकाश सावंत, श्री. धरणे, विष्णू (बाळा) घोगळे, जनार्दन डोबकर, यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना संपर्क प्रमुख रवींद्र फाटक तसेच संदेश पटेल, विष्णू घोगळे, जनार्दन डोबकर, अनंत राणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व वारकरी संप्रदाय कणकवली हळवल चे वारकरी मंडळी उपस्थित होते.