*कोकण Express*
*या दंगलीमागे उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहेत का ? याची चौकशी व्हावी*
*सत्ता हवी तर दंगली घडल्या पाहिजेत ही भूमिका ठाकरेंची ; आमदार नितेश राणे*
*काँग्रेसच्या एका नेत्याने कोल्हापूर येथे दंगली घडतील अशी शक्यता वर्तवली होती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
औरंगजेब,टिपू सुलतान यांच्यावर आज अचानक प्रेम उफाळून आलेले नाही.याचे काही दिवसापूर्वी पासून प्लानिंग सुरू आहे.
काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या एका नेत्याने कोल्हापूर येथे दंगली घडतील अशी शक्यता वर्तवली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राजाराम राऊत तर गेले कित्येक दिवस दंगली घडणार म्हणून किंचाळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यभिषेक दिनी औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवले गेले.सत्ता आली पाहिजे तर दंगली घडल्या पाहिजेत ही भूमिका उद्धव ठाकरेंची २००४ पासून आहे. आज सुद्धा त्यांना सत्ता हवी आहे. मग या दंगलीमागे उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहे का ? याची चौकशी करा.उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा अशी पुन्हा मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे पत्रकारांशी बोलतांना आमदार नितेश राणे यांनी दंगली घडण्यासाठी महा विकास आघडीती काही लोकांचा हात असल्याचा आरोप केला. काँग्रेस चे नेते राहुल गांधी अमेरिकेत भारतीय आणि हिंदू विरोधी भूमिका मांडत आहेत. तेव्हाच कोल्हापूर मधील त्यांचे नेते दंगली घडणार म्हणून सांगत आहेत. आणि त्याच दोन आठवड्यात औरंग्या आणि टिपू सुलतान चे टेटस काही युवक लावतात याचा थेट संबंध कोणाशी कसा येतो हे चौकशीत नक्कीच स्पष्ट होणार आहे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा तसे विधान केलेले आहे याची आठवण यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.
महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा याकूब मेमन ची कबर सुशोभित केली, विद्युत रोषणाई केली., औरंगजेबची कबर सजविली. हे प्रेम महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उत्पन्न झाले होते. त्यामुळे दंगली घडविण्याचे इंटेन्शन महाविकास आघाडीचे आहे हे स्पष्ट दिसते आहे.त्यामुळे गृहमंत्रालयाच्या वतीने चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार आहे.
काही दिवसा पासून राज्यातील काही जिल्हात जिहादी कार्टे वातावरण बिघडवत आहेत.
औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे प्रेम ज्यांना असेल त्यांना त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था आम्ही करू. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आम्ही कधीही खपवून घेणार नाही आणि औरंगजेब टिपू सुलतान यांचा उदो उदो केला जात असे,स्टेटस ठेवले जात असतील, फलक नाचवले जात असतील तर तेही सहन करणार नाही अशा महाराष्ट्र द्र्रोहिनवर कारवाई होणार इशारा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
महाविकास आघाडीला मोगली राज्य हवे असेल आणि महाराष्ट्रात मोगली राज्य पुन्हा आणायच आहे म्हणून दंगली घडवत असतील तर आम्ही छत्रपती शिवरायांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी सज्जा होत.महाराजांच्या अस्मिते साठी आणि हिदू समाजाच्या संरक्षणासाठी प्रसंगी तलवार पण हातात घेण्यास त्यात आहात.असा इशारा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
भाजपा नेते आशिष शेलार ने विधानसभेत सागितले होते की महा विकास आघाडीची सत्ता असताना ठाकरेंचा महापौर असताना बास खरेदी केली त्या कंपनीत दोन पाकिस्तानी पार्टनर आहेत.मग आम्ही मोर्चे मातोश्रीवर काढायचे काय ? तुझ्या मालकाच्या मुलाला आधी देशाबद्दल ची गद्दरी थांबवायला सांग आणि नंतर आम्हाला उपदेश कर अशा शब्दात संजय राउत यांना सुनावले.