*कोकण Express*
*राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी, छ. शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,कन्हैया पारकर, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर,युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुकाप्रमुख राजू राणे, रुपेश आमडोस्कर, राजू राणे, विलास गुडेकर, सचिन आचरेकर, अनुप वारंग, धनंजय सावंत,प्रमोद कावले, रवींद्र सावंत, दादा भोगले, दिव्या साळगावकर,संजना कोलते, गिरीश घाडीगावकर, नितीन धुरी, दिनेश अपराज आदी उपस्थित होते.